Share

Rohit Pawar : “शरद पवार आणि अजित पवार मार्गदर्शन करतील पण निर्णय…”, रोहित पवारांच मोठं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा वक्तव्य केला आहे. रोहित पवार नेहमीच युवकांची बाजू मांडण्यासाठी ओळखले जातात. तसेच त्यांच्याकडे राज्याच्या राजकारणातील युवा नेतृत्व म्हणूनही पाहिले जाते. दरम्यान रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत मोठा वक्तव्य केला आहे. २०२४ नंतर राजकारणाची समीकरणं बदलणार असून नवीन पिढीलाच निर्णय घावे लागणार आहेत. अशा प्रकारचं विधान रोहित पवार यांनी केल आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय कुजबूज सुरू झाली आहे.

जुन्नर येथील एका आयोजित सभेत रोहित पवार बोलत होते. यावेळी बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, “२०२४ नंतरची वेळ ही युवकांची असणार आहे. २०२४ ला आपल्याला एकमेकांसोबत राहून आपल्या हिताचे आणि आपल्या विचाराचे सरकार कसे येईल, याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे जेव्हा युवकांची वेळ येईल तेव्हा निर्णयही युवकांनीच घेतले पाहिजेत. त्या निर्णयांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच, पण कोणते काम कसे करायचे? आणि कोणतं पद कोणाकडे द्यायचं? हे निर्णय युवा पिढीच घेईल.” अशा प्रकारचे विधान रोहित पवार यांनी कले आहे.

“मी असेही म्हणत नाही की सर्वच कामे आम्ही करू, मात्र नवीन पिढी आणि युवक ते त्यांचे निर्णय घेतील. मी भविष्यातील वाटचालीचा तसेच पुढील काळाचाही बराच विचार करून राजकारणात आलो आहे. असे नाही की मी पदाचा विचार नाही करत, मात्र महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या भल्याचं काम करायचं आहे.” असे रोहित पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!