🕒 1 min read
मुंबई: गेला काही काळ शिवसेनेसाठी कठीण होता. विश्वासू नेत्यांनी बंडखोरी केली त्यातच भाजपकडून होणाऱ्या सततच्या टीका,पण या काळात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेहमीच परखड शब्दात विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. बंडखोर नेत्यांनाही त्यांनी वेळोवेळी सुनावलं. त्यामुळेच सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या टार्गेटवर संजय राऊत आले आहेत. राऊतांला टीकेला सामोरं जावं लागत आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय राऊत यांच्यावर अनेक टीका केल्या. त्यावर आज राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत हे आज माध्यमांशी बोलत असताना म्हणाले कि, “मिस्टर फडणवीस, तुमची सर्व कारस्थाने मला माहीत आहेत. तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई करा. केंद्रीय तपास यंत्रणांची करा, सीबीआयची करा किंवा इतर कोणतीही कारवाई करा. आय एम रेडी टू फेस एनी ॲक्शन”. तसेच फडणवीसांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते असेही म्हणाले कि, “रोज सकाळी उठून तुम्हाला माझा लाऊडस्पीकर ऐकावा लागतो. कारण आम्ही तुमच्या पिपाण्या बंद केल्या आहेत. पण शिवसेनेचा लाऊडस्पीकर कोणी बंद करू शकत नाही आणि सकाळीच आम्ही २४ तास बोलत राहू. कारण हा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे, तो कुणीही बंद करू शकत नाही”, असा इशारा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
काय म्हणाले होते फडणवीस
संजय राऊतांचा लाऊडस्पीकर रोज सकाळी लागतो पण तो कमी करणं गरजेचं होतं. महाराष्ट्रात जो बदल झाला आहे त्याचे श्रेय काही प्रमाणात शिवसेनेच्या त्या लाऊडस्पीकरलाही जाते. त्यामुळे खरं तर आपण राऊतांचे आभार मानले पाहिजेत कारण राऊतांमुळेच आपलं सरकार आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Raj Thackeray : शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु – राज ठाकरे
- Raj Thackeray : पवारांनी सांगितलं म्हणून मी माझा पक्ष काढेल का? राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
- Shinde Government : हे सरकार शेतकऱ्यांसाठी अपयशी ठरतय का? २४ दिवसांत ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
- Eknath Shinde | आम्ही बाळासाहेबांना आवडणारी भूमिका घेतली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Sharad Pawar | बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रावर दुसऱ्या कोणी केला नाही – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
