मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि पक्षातील तब्बल ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. या संख्याबळाच्या जोरावर शिंदेंनी भाजपशी हात मिळवून राज्यात सत्ता स्थापन केली. तर दुसरीकडे शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला गळती लागली. त्यामुळे आमदारांसह शिवसेना पक्षाचे खासदार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही शिंदे गटाच्या वाटेवर निघाले. राज्यात एकनाथ शिंदेंनी संख्याबळ दाखवत जरी सत्ता स्थापन केली असली, तरी ती कायद्याच्या चौकटीत टिकेल का हा मात्र अजूनही प्रश्नच आहे. सरकार शाबूत ठेवायचे असेल तर शिंदे गटाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल, असा दावा करण्यात येत आहे. असे असताना शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय व पक्षाच्या नेतृत्वाबाबत राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी याबाबत स्पष्टपणे मत व्यक्त केले. “मी पक्षातून बाहेर पडण्या अगोदर बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यांना कायम एकच विचारत होतो की माझा पक्षामध्ये जॉब काय आहे? मला फक्त प्रचारामध्ये भाषण करण्यासाठी वापरणार असाल, तर मी दुसऱ्यांसाठी माझा शब्द देऊ शकत नाही.
मी हे मान्य करतो की पक्षप्रमुख पदाचा निर्णय हा बाळासाहेब ठाकरेंचा होता. मी महाबळेश्वरला असतानाच बाळासाहेब ठाकरे यांना फोन करून बोललो होतो की, मला माहिती आहे तुमच्या मनात काय आहे. उद्धव ठाकरे यांना तुम्ही अध्यक्ष करा, फक्त या नावाची घोषणा मला करू द्या. कारण मग यानंतर उद्धव की राज अशी चर्चा बंद होईल. शेवटी ही चर्चा बंद करण्यात मी यशस्वी झालो याचे मला समाधान होते. असेही राज यांनी स्पष्ट केले.
दरम्यान शिंदे गटाने मनसेत विलीन होण्याचा प्रस्ताव आल्यास, कोणता निर्णय घ्याल असे राज यांना विचारले असता ते म्हणाले की, “शिवसेनेत ज्या ज्या नेत्यांनी बंड पुकारला आहे ते सर्व माझे जुने सहकारी आहेत. यापूर्वीही मी त्यांच्यासोबत पक्षात एकत्र काम केले आहे. जर एकनाथ शिंदे गटाकडून मनसेत विलिन होण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर नक्की विचार करू. तसेच सर्वप्रथम माझ्यासाठी माझा महाराष्ट्र सैनिक असेल आणि त्यानंतर बाकीचे असतील, असेही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray : पवारांनी सांगितलं म्हणून मी माझा पक्ष काढेल का? राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
- Shinde Government : हे सरकार शेतकऱ्यांसाठी अपयशी ठरतय का? २४ दिवसांत ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
- Eknath Shinde | आम्ही बाळासाहेबांना आवडणारी भूमिका घेतली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Sharad Pawar | बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रावर दुसऱ्या कोणी केला नाही – शरद पवार
- Devendra fadnavis | “…त्यांना ओबीसी आरक्षण द्यायचेच नव्हते”; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

