🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क: पावसाळा सुरु झाला कि, छान चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात. अनेक वेळा आपण बाहेर जाऊन हॉटेल किंवा गाड्यांवरचे भजी, वडापाव, पॅटिस असे पदार्थ खातो. या दिवसात चहाबरोबर तळलेले पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते. पण नेहमी नेहमी बाहेरचं खाल्ल्याने फूड पॉइझनिंग होऊन अनेक आजार होऊ शकतात. लहान मुले तर खूपच लवकर आजारी पडतात. तसेच नेहमीचे तेच भजी, वडापाव खाऊन तुम्हीही कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला काही नवीन आणि सोपे पदार्थ सांगणार आहोत. जे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि ज्याचा आस्वाद चहाबरोबर घेऊ शकता.
पालक पुरी
साहित्य: १ वाटी गव्हाचे पीठ, १ वाटी मैदा, २० – २५ पालकाची पाने, ५-६ हिरव्या मिरच्या, जिरेपूड, गरम मसाला, धणेपूड, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
पालक नीट धुवून त्याची पाने वेगळी करा. आता ती पाने एक कप पाण्यात उकळून थंड करा. नंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवा. नंतर दोन्ही पीठे मिक्स करून त्यात पालक पेस्ट, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, जिरेपूड, धणेपूड, लाल मिरची आणि गरम मसाला आणि चिरलेली कोथिंबीर घाला. हे सर्व एकत्र करून मळून घ्या. आता या पिठाचे छोटे गोळे करून पुऱ्यांप्रमाणे लाटून घ्या. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि पुऱ्या सोनेरी होईपर्यंत तळा.
आलू कबाब
साहित्य : ३-४ बटाटे, अर्धी वाटी कॉर्न फ्लोर, अर्धी वाटी मैदा, चवीनुसार मीठ, काळी मिरीपूड, लाल तिखट, कसुरी मेथी आणि तळण्यासाठी तेल
बटाटे उकडून घ्या आणि थोडे थंड झाल्यावर मॅश करा. आता उकडलेल्या पाण्यात कॉर्न फ्लोर आणि मैदा घाला. यानंतर त्यात मीठ, काळी मिरीपूड, लाल तिखट आणि कसुरी मेथी मिसळून छोट्या टिक्की तयार करा. कढईत तूप किंवा तेल गरम करून या टिक्की सोनेरी होईपर्यंत तळा.
मुगाचे पकोडे
साहित्य : २ वाट्या मूग डाळ, ५-६ हिरव्या मिरच्या, लाल मिरची पावडर, बडीशेप पावडर, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी आणि तळण्यासाठी तेल
एक दिवस आधी मूग डाळ पाण्यात ठेवा. दुस-या दिवशी मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक करून बारीक करून एका भांड्यात काढून घ्या. आता या पेस्टमध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट, लाल मिरची पावडर, बडीशेप पावडर, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी घाला. ते मिश्रण ५ मिनिट ढवळत राहा. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने तेलात टाळून घ्या.
महत्वाच्या बातम्या:
- Deepali Sayed | शिवसेना आमदार, खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे – दीपाली सय्यद
- Deepak Kesarkar : नेत्यांना अपमानित करून जनतेची दिशाभूल करू नका; केसरकरांचा आदित्य ठाकरेंना इशारा
- Aditya Thackeray : कधीच कोणासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले नव्हते – आदित्य ठाकरे
- Alcohol addiction | मद्य शौकिनांनो सावधान!; दारूमुळे तरुणांवर होणारे ‘हे’ दुष्परिणाम वाचा
- Dr.Bharti Pawar। द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदावर निवड झाली हा आमच्यासाठी सोनेरी क्षण – भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
