Deepak Kesarkar । नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ५० आमदार घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. आमदारानंतर आता १२ खासदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना समर्थन दर्शवल आहे. तर दुसरीकडे विस्कळीत झालेल्या पक्षाची पुन्हा मोट बांधण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभर निष्ठा यात्रा काढण्यास सुरवात केली आहे. या यात्रेदरम्यान, आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधण्यास सुरवात केली आहे. यानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिल आहे.
दीपक केसरकर म्हणाले कि, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात सध्या महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रा सुरु आहेत. शिवसैनिकांना ठाकरेंद्वारे मार्गदर्शन केलं जात आहे. मात्र या वेळी आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर आरोप, अपमान करत आहेत. अशा प्रकारे नेत्यांना अपमानित करून जनतेची दिशाभूल करू नका. बाळासाहेब एकवचनी होते. शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं गेलं होतं ही वस्तुस्थिती आहे. हे पद दिलं नाही. शिंदेसाहेब शांत राहिले, असं ते म्हणाले.
तर पुढे आदित्यजींनी एका मुलाखतीत सांगितलं, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद सोडतो असं सांगितलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले होते मुख्यमंत्री तुम्हीच रहा, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको. ते शिवसेनेला संपवणार आहेत. भाजप-सेनेची युती करा आणि मुख्यमंत्री तुम्हीच रहा.. असं म्हणाले होते..मग एकनाथ शिंदेंची बदनामी का चालवली आहे?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Deepali Sayed | शिवसेना आमदार, खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे – दीपाली सय्यद
- Deepak Kesarkar : नेत्यांना अपमानित करून जनतेची दिशाभूल करू नका; केसरकरांचा आदित्य ठाकरेंना इशारा
- Aditya Thackeray : कधीच कोणासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले नव्हते – आदित्य ठाकरे
- Alcohol addiction | मद्य शौकिनांनो सावधान!; दारूमुळे तरुणांवर होणारे ‘हे’ दुष्परिणाम वाचा
- Dr.Bharti Pawar। द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदावर निवड झाली हा आमच्यासाठी सोनेरी क्षण – भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

