🕒 1 min read
मुंबई : रायपूर येथे दोन दिवसीय ‘धर्म संसद’ आयोजित करण्यात आली होती. रविवारी(२६ डिसें.) या संसदेचा समारोप झाला. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या धर्म संसदेत अकोल्याच्या कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल(Mahatma Gandhi) अपशब्द वापरले. फक्त एव्हढेच नाही तर महात्मा गांधींवर शिवीगाळ करत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुकही केले. या प्रकरणानंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल(Bhupesh Baghel) यांनी याविषयी भाष्य केले आहे.
यासंदर्भात भूपेश बघेल यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’बापूंना शिव्या देऊन, समाजात विषाच्या उलट्या करून, एखाद्या भोंदूला वाटत असेल की आपण आपल्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होऊ, तर तो त्याचा भ्रम आहे. तसेच या भोंदूंच्या दोन्ही गुरुनेही ऐकावे..भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल… त्याला ना संविधान सोडणार आहे ना जनता स्वीकारणार आहे’, असे बघेल म्हणाले आहेत.
बापू को गाली देकर, समाज मे विष वमन करके अगर किसी पाखंडी को लगता है कि वो अपने मंसूबों में कामयाब हो जाएंगे, तो उनका भ्रम है।
उनके आका भी दोनों सुन लें..
भारत और सनातन संस्कृति दोनों की आत्मा पर चोट करने की जो भी कोशिश करेगा… न संविधान उसे बख्शेगा, न जनता उन्हें स्वीकार करेगी।
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) December 27, 2021
दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर कालीचरण महाराज यांच्यावर रविवारी सायंकाळी आयपीसीच्या कलम ५०५(२) आणि २९४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई व्हावी- रुपाली ठोंबरे पाटील
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल; राष्ट्र्वादीचा इशारा
- रोहिणी खडसे हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत मांडणार- चंद्रकांत पाटील
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांनी घेतला खरपूस समाचार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
