Share

Bala Nandgaonkr | “मनसेचा ‘एकला चलो रे’ चा नारा काल ही होता अन…”; बाळा नांदगावकर यांचे सूचक विधान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बऱ्याच वेळ चर्चा देखील झाली. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसे यांची युती होणार असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना युती संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी एक सूचक विधान केले आहे.

 

“महाराष्ट्रातीळ सध्याची परिस्थिती पाहिली तर मनसेसाठी अत्यंत सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. इतर सगळ्या पक्षांविषयी लोकांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आमच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत सकारात्मक आहे. त्यामुळेच आमचा ‘एकला चलो रे’चा नारा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे,” असे नांदगावकर यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!