🕒 1 min read
Ajit Pawar । अहमदनगर : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस अनेक मोठे गौप्यस्फोट होतायत. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाला कोणाला स्थान मिळणार याबाबत मोठ्या चर्चा सुरु आहेत.तसेच सरकार स्थापन होऊन आता १५ दिवस झाले. मात्र अजूनही सरकार स्थापन झालं नाही. आता हाच मुद्दा विरोधी पक्षाने उचलून धरला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
सध्या महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस सुरूर आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. रोप वाया गेली. पेरण्या झाल्या मात्र जास्त पावसामुळे ते वाया गेले. अॅक्शन घेणे गरजेचे आहे काही शेतकरी म्हणाले अजून आमच्याकडे कोणी आले नाही. किमान पालकमंत्री तरी नेमावे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचीदेखील त्यांनी पाहणी केली. सध्या राज्यात केवळ दोनच व्यक्ती कारभार पाहत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी शिंदे-फडणवीस यांचा अधिकार आहे. ते काही विरोधीपक्ष नेत्याचे काम नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमतदेखील आहे. अशावेळी राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणे योग्य नाही. मात्र दुसरीकडे अनेकांना शब्द दिले आहेत. ते पाळले जातील की नाही, अशी शंका त्यांना वाटत असेल, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला.
दरम्यान, 12 दिवस झाले तरी सरकार अस्तित्वात नाही. कारण दोन लोकांचं सरकार हे बेकायदेशीर आहे. आमदार अपात्रं ठरू शकतात. त्यांना शपथ देणं हा राजद्रोह आहे. हे घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजकीय भ्रष्टाचार आहे. त्याची भीती असल्याने त्यांना रोखलं असावं. राज्यपालांनी कोणतंही घटनाद्रोही कृत्य करू नये, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kapil Dev on Virat Kohli : कपिल देव यांच पुन्हा एकदा विराटबद्दल मोठं वक्तव्य; यावेळी ते काय म्हणाले? वाचा!
- Ajit Pawar | “आताच यांची माईक ओढाओढी चालू आहे…”; अजित पवारांची खोचक टीका
- CM Eknath Shinde : “औरंगाबादच्या नावाला स्थगिती नाही, उद्या कॅबिनेटमध्ये अधिकृत निर्णय घेऊ”; मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Shahaji Bapu Patil | पुन्हा घुमणार “काय झाडी, काय डोंगार…” चा आवाज; शाहाजी बापू पाटील येणार ‘थुकरटवाडीत’
- IND vs ENG : लॉर्ड्सवर टीम इंडिया अडचणीत असताना चाहत्यांना आली धोनीची आठवण; पाहा VIDEO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
