🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी पुन्हा एकदा विराट कोहलीबाबत वक्तव्य केले आहे. याअगोदर त्यांच्या कोहलीला टी-२० संघातून वगळण्याच्या वक्तव्याने खळबळ उडाली होती. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा असं काही म्हंटलं आहे, ज्यामुळे पुन्हा चर्चा निर्माण होऊ शकते. बीसीसीआयने एक दिवस आधीच वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली होती. यामध्ये विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहचे नाव नव्हते. या दोघांनाही या दौऱ्यातून बाहेर ठेवण्याचे कोणतेही कारण बीसीसीआयने दिलेले नाही. परंतु, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले की, दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, या मुद्द्यावर कपिल देव यांनी वेगळेच मत व्यक्त केले आहे. कपिल देव एबीपी न्यूजवर बोलताना म्हणाले की, “विराट कोहलीसारख्या मोठ्या खेळाडूला वगळावे असे मी म्हणू शकत नाही. तो मोठा खेळाडू आहे. त्याला आदर देण्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे असे तुम्ही म्हटले असेल तर त्यात काही गैर नाही.”
कोहलीला विश्रांती दिली की आणखी काही?
कंबरेच्या दुखापतीमुळे कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदवसीय सामन्यात खेळला नव्हता. पण, लॉर्ड्सवरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले होते. अशा परिस्थितीत एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झाली आहे की वेस्ट इंडिज दौऱ्याचा विराटच्या दुखापतीशी काहीच संबंध नाही. कारण तो इंग्लंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळला आहे. त्याने ५० षटके क्षेत्ररक्षण केले आणि नंतर फलंदाजीलाही आला. या सामन्यात तो १६ धावा करून बाद झाला होता.
सध्या कोहलीचे फॉर्ममध्ये परतणे अधिक महत्त्वाचे
कपिल देव पुढे म्हणाले की, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा खेळाडूला फॉर्ममध्ये कसे आणायचे? तो काही सामान्य क्रिकेटपटू नाही. हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी त्याने जास्तीत जास्त सरावाने सामने खेळले पाहिजेत. मला वाटत नाही की या जगात टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीपेक्षा मोठा खेळाडू आहे. पण, जेव्हा तुमची कामगिरी चांगली नसेल तेव्हा निवडकर्ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. माझे स्वतःचे मत आहे की, जर एखादा खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला संघातून विश्रांती दिली जाऊ शकते किंवा वगळले जाऊ शकते.
"Yes, he's been dropped or rested but there's still a lot of cricket left in him. And he has to create the path for that. Maybe play Ranji Trophy or score runs anywhere. His confidence needs to be back," said Kapil Dev on Virat #Kohli https://t.co/kcXAjEXln7
— Firstpost Sports (@FirstpostSports) July 15, 2022
कोहलीने त्याची कमजोरी लवकरात लवकर शोधली पाहिजे
कपिल देव म्हणाले की, कोहलीला धावा काढण्याचा मार्ग शोधण्याची गरज आहे. कारण त्याच्यासारख्या महान खेळाडूंना फॉर्ममध्ये येण्यासाठी इतका वेळ लागू नये. कपिल देव यांच्या म्हणण्यानुसार, “गेल्या पाच-सहा वर्षांत भारत विराटशिवाय खेळला नाही, असे नाही, पण असा खेळाडू फॉर्ममध्ये यावा अशी माझी इच्छा आहे. हो त्याला विश्रांती देण्यात आली आहे किंवा संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. ते काहीही असले तरी त्याच्यात क्रिकेटचे बरेच काही शिल्लक आहे. त्याला धावा काढण्याचा मार्ग शोधावा लागेल. कदाचित रणजी ट्रॉफी खेळा किंवा कुठेही धावा करा. जर त्याला संघातून बाहेर काढले किंवा विश्रांती दिली याच्याशी मला काहीच हरकत नाही. पण त्याने फॉर्ममध्ये यावे असे मला वाटते. एका डावाने महान खेळाडूचे नशीब बदलू शकते पण ते कधी येईल हे माहीत नाही? आम्ही विराट कडून चांगल्या कामगिरीची दोन वर्षांपासून वाट पाहत आहोत.”
महत्वाच्या बातम्या :
- CM Eknath Shinde : “औरंगाबादच्या नावाला स्थगिती नाही, उद्या कॅबिनेटमध्ये अधिकृत निर्णय घेऊ”; मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Shahaji Bapu Patil | पुन्हा घुमणार “काय झाडी, काय डोंगार…” चा आवाज; शाहाजी बापू पाटील येणार ‘थुकरटवाडीत’
- IND vs ENG : लॉर्ड्सवर टीम इंडिया अडचणीत असताना चाहत्यांना आली धोनीची आठवण; पाहा VIDEO!
- Devendra Fadnavis’ Aukshana : राज ठाकरेंच्या पत्नींने केले देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण
- Delhi : दिल्ली पुन्हा हादरली! धावत्या कारमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; घटनेचा बनवला VIDEO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
