Share

Supriya Sule | “राज्यात कोणीही कोणत्याही पक्षात फिरत आहे, त्यामुळे…”; सुप्रिया सुळेंचा दीपक केसरकरांना टोला

Published On: 

🕒 1 min read

पुणे: ज्यावेळी शिवसेनेत बंड झाले तेव्हा सध्याचे शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत राष्ट्रवादीमुळेच आमच्यावर ही वेळ आली असल्याचे आरोप केले होते. तेव्हापासून केसरकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केसरकरांना एक खरमरीत टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या कि “दीपक केसरकर यांच्याबरोबर मी अनेक सभा केल्या आहेत. ते तेव्हा राष्ट्रवादीत होते. पण ते आता कोणत्या पक्षात आहेत? मला नक्की माहित नाही.”, त्यावर इतरांनी केसरकर हे सध्या शिंदे गटात असल्याचे सांगितले. त्यावर “सॉरी, मला माहित नव्हतं हा. काय आहे ना कुणीही कोणत्याही पक्षात फिरत आहेत. त्यामुळे माझं जरा कॉन्फयुजन झालं”, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी त्यांच्या खास शैलीत केसरकारांवर टीका केली आहे.

केसरकर माफी मागायला तयार

दीपक केसरकरांनी आधी राष्ट्रवादीवर अनेक आरोप केले. त्यावर आता त्यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची माफी मागण्याची तयारी दर्शवली आहे. “शरद पवार हे देशाचे नेते आहेत. माझ्या गुरुसमान आहेत. त्यामुळे जर मी त्यांच्याबद्दल काही उपशब्द काढले असतील, तर मी त्यांची माफी मागायला तयार आहे”, असे दीपक केसरकर म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!