Share

Pratap Sarnaik | “उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागताला आले नाही…”- प्रताप सरनाईक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रपतीपदासाठीच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबईत दाखल झाल्या आहेत. तेव्हा मुर्मू यांच्या स्वागतासाठी भाजपचे अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित होते. त्याचबरोबर शिंदे गटातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

“उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागताला आले नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र शिवसेनेने आजपर्यंत कधीही कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे यावरून भेदभाव केलेला नाही. आधीही प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील हे काँग्रेसच्या उमेदवार असूनही बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्याचप्रमाणे आता उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं कौतुक करायला हवं”, असे प्रताप सरनाईक यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!