Share

IND vs ENG : भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये मोहम्मद शमीच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत यजमान संघाचा १० गडी राखून पराभव केला होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज चांगलेच फॉर्ममध्ये होते. याच सामन्यात बुमराहने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. दुसरीकडे मोहम्मद शमी एकदिवसीय क्रिकेटमध्ये देशासाठी सर्वात जलद १५० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून मोहम्मद शमीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो एकदिवसीय क्रिकेटमधील त्याच्या १५० बळींच्या यशाबद्दल बोलताना दिसत आहे. तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरलो आहे. त्यामुळे डोक्यात प्लॅनिंग असल्याचे त्याने सांगितले. तुम्हाला कोणत्या लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करायची आहे हे माहीत आहे. पण त्यासाठी धाडस मोठे असले पाहिजे. तुमच्याकडे धाडस असेल तर तुम्ही कोणत्याही क्षणी कुठेही वर्चस्व मिळवू शकता.

पाहिल्या सामन्यात बुमराहला ७.२ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त १९ धावा देऊन ६ गडी बाद करण्यात यश मिळाले. तर शमीने दमदार गोलंदाजी करताना ७ षटकांच्या स्पेलमध्ये ३१ धावा देत ३ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. शामिने त्याच्या गोलंदाजीत बेन स्टोक्स, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि क्रेग ओव्हरटन यांना बाद केले. शमीच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर देशासाठी ६० कसोटी सामने खेळताना त्याने ११४ डावात २७.४ च्या सरासरीने २१६ बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेट व्यतिरिक्त त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८० सामन्यांच्या ७९ डावात २५.३ च्या सरासरीने १५१ बळी घेतले आहेत. शमीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ सामन्यात ३१.६ च्या सरासरीने १८ गडी बाद केले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!