🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकानंतरच होईल अशी शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध सुरू आहे. दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला होता. नारायण राणे आणि छगन भुजबळ यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास पवारांनी मदत केली, असा आरोप केसरकर यांनी केला होता. जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केसरकर यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.
“अहो केसरकर किती बोलता पवार साहेबांविरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात. 2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन. जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका.” अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी दीपक केसरकारांवर पलटवार केला आहे.
अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले
ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात
2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन
जिथे आहात तिथे सुखी राहा
खाजवून खरूज काढू नका— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 13, 2022
केसरकर काय म्हणाले होते?
महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते, असा आरोप केसरकर यांनी केला आहे. शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तर शरद पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावे, असेही केसरकर म्हणाले. मी प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे. मी राष्ट्रवादीत असताना शरद पवार मला विश्वासात घेऊन सांगायचे. नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनी मदत केली होती. मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जावे. ही अट ठेवली नसल्याचे शरद पवारांनी मला सांगितल्याचे केसरकर म्हणाले होते.
निलेश राणेंनी केसरकरांना लगावला टोला
“दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका.”अशा शब्दात निलेश राणेंनी केसरकरांना उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
