Share

Deepak Kesarkar | शिवसेना सोडताना राज ठाकरेंच्या पाठीशी शरद पवारांचे आशीर्वाद होते – दीपक केसरकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात झालेल्या सत्तानाट्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतरच महाराष्ट्रात नवीन मंत्रिमंडळ स्थापन होईल, असे मानले जात आहे. मात्र त्यापूर्वी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात चांगलचं शाब्दिक युद्ध सुरु आहे. शिंदे गटात असलेले आमदार दीपक केसरकर यांनी मोठा दावा केला आहे. शरद पवार यांनी नारायण राणे यांना शिवसेना पक्षातून बाहेर पडण्यास मदत केली, राज ठाकरे यांच्या पाठीशी देखील त्यांचा आशिर्वाद होता, असे केसरकर म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दीपक केसरकर हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांनी अनेक खुलासे केले आहे. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते, असा आरोप केसरकर यांनी केला आहे. शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तर शरद पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावे, असे केसरकर म्हणाले.

दीपक केसरकर म्हणाले, मी प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे. मी राष्ट्रवादीत असताना शरद पवार मला विश्वासात घेऊन सांगायचे. नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनी मदत केली होती. मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जावे. ही अट ठेवली नसल्याचे शरद पवारांनी मला सांगितल्याचे केसरकर म्हणाले.

छगन भुजबळ यांना तर शरद पवार स्वत: बाहेर घेऊन गेले होते. राज ठाकरेंच्या पाठीशीही त्यांचे आशीर्वाद होते. राज ठाकरे त्यांना मानतात, असा दावा देखील दिपक केसरकर यांनी केला आहे. दीपक केसरकर यांनी कलेल्या खळबळजनक दाव्यामुळे राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. यावेळी केसरक यांनी उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या पाठींब्याचे कौतुक केले. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा निर्णय घेतल्याचे केसरकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!