Share

Vasai Landslide : वसईत दरड कोसळून एकाचा मृत्यू; चार जण अडकले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: वसई राजवलीच्या (Vasai Landslide) वाघरल पाडा या परिसरात दरड कोसळली असून त्याखाली 4 जण अडकले आहेत. एका घरावर ही दरड कोसळली होती. यामध्ये चार पैकी दोघांना वाचवण्यात आलं असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर अजून एकाचा शोध सुरु आहे.  याठिकाणी वसई विरार महापालिका अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

दरम्यान अमित ठाकूर, रोशनी ठाकूर, वंदना ठाकूर, ओमकार ठाकूर हे दरडीत फसले गेले होते. त्यातील अमित ठाकूरला  बाहेर काढण्यात यश आले आहे. तर वंदना ठाकूर आणि ओमकार ठाकूर जखमी झाले आहेत. त्यामुळे अजूनही येथे बचावकार्य सुरु आहे.

या दुर्घटनेनंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एमएमआरडीकडून पाईपलाईन काम करण्यात आल्यानंतर संरक्षक भिंत बांधली गेली असती तर ही घटना घडली नसती असे स्थानिकांनी म्हटले आहे. दरम्यान अजून दोन जण दरडीखाली दबले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!