🕒 1 min read
मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूबाबत एनसीबीने मोठा दावा केला आहे. एनसीबीने पुन्हा एकदा सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती वर (गांजा) ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोप केला आहे. सुशांत सिंह मृत्यू केसमध्ये अंमली पदार्थ (ड्रग्ज) संबंधित प्रकरणात (एनसीबी) एनसीबीने एक अहवाल तयार केला आहे. ज्यामुळे अनेक गुपिते उघड होण्याची शक्यता आहे.
या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, रिया चक्रवर्तीने तिचा भाऊ शोविक आणि त्याच्या साथीदाराकडून अनेक वेळा गांजा विकत घेतला आहे. तिने सुशांतला गांजाचे सेवन करण्यासाठी प्रोत्साहित केले होते. तसेच अनेक वेळा तिने स्वतः सुशांतला गांजा दिला होता. अहवालात दाखल केलेल्या आरोपांनुसार, मार्च 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान सर्व आरोपींनी मिळून उच्चभ्रू समाजातील आणि बॉलीवूडमधील व्यक्तींना अंमली पदार्थ विकण्यासाठी तसेच अंमली पदार्थांची विक्री आणि खरेदी सुलभ करण्यासाठी एकमेकांच्या संगनमताने हा कट रचला होता.
या प्रकरणात, एनसीबीने रिया आणि शोविकसह अनेक आरोपींवर ड्रग्ज खरेदी करणे आणि ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत. ज्यामध्ये रिया ड्रग्ज विकत घेऊन ते सुशांतला देत होती, असे म्हणण्यात आले आहे.
रियाचा भाऊ पेडलरच्या संपर्कात
एनसीबीने आरोपात असेही म्हटले आहे की आरोपी क्रमांक 10 म्हणजेच रिया चक्रवर्तीला आरोपी सॅम्युअल मिरांडा, शोविक (रियाचा भाऊ), दीपेश सावंत आणि इतरांकडून गांजाच्या अनेक डिलिव्हरी मिळाल्या आणि तिने तो गांजा सुशांत सिंह राजपूतला दिला. एवढेच नाही तर शोविक चक्रवर्तीच्या सांगण्यावरून रियाने मार्च 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत त्या डिलिव्हरीचे पैसे देखील दिले. शोविक हा ड्रग्स तस्करांच्या सतत संपर्कात असायचा. गांजा आणि चरस ऑर्डर केल्यानंतर सहआरोपींकडून त्याला या अंमली पदार्थांची डिलिव्हरी मिळत असे आणि त्यांनतर तो सर्व ड्रग्ज सुशांतला देत होता.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
