Share

Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंचा एनडीएच्या मुर्मू यांना पाठिंबा; शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (मंगळवार) मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी (राष्ट्रपती निवडणूक) पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी किंवा अन्य कोणीही आपल्यावर कोणताही दबाव टाकला नसल्याचेही ते म्हणाले. शिवसेना खासदारांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावरच शिंदे गटातील नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“आजपर्यंत एकही आदिवसी महिला या देशाच्या सर्वोच्च पदावर बसली नाही. हा पाठिंबा कोणा एका व्यक्तीचा नसून, महाराष्ट्राच्या जनमताचं प्रतिक आहे. बाळासाहेब ठाकरे प्रसंगी एनडीएच्या बाहेर जाऊन मतदान करायचे. उद्धव ठाकरे यांनी  आज तो गित्ता गिरवला आहे, याचा मला अभिमान आहे.”, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान दरम्यान सोमवारी खासदारांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी निर्णय घेण्याचे अधिकार आपल्यावर सोपवल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. मात्र पहिल्यांदाच देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिलेने विराजमान व्हावे, ही शिवसेनेची इच्छा तर आहेच, शिवाय ती देशासाठी अभिमानाची बाब असेल. त्यामुळेच राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!