🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू उमेश यादव (Umesh Yadav) सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. उमेश यादव वनडे, टी-२० व्यतिरिक्त कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग नाही, परंतु आता उमेश यादवबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. उमेश यादव काऊंटी चॅम्पियनशिप रॉयल लंडन वनडे कपमध्ये मिडलसेक्सचा भाग असेल. या मोसमातील उर्वरित सामन्यांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज मिडलसेक्सचे प्रतिनिधित्व करणार आहे.
उमेश यादवने भारतीय संघासाठी आतापर्यंत ५२ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ५२ कसोटी सामन्यात १५८ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान उमेश यादवने १३३ धावांत १० बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये या वेगवान गोलंदाजाने ३ वेळा ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. यासोबतच त्याने एकदा सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत. उमेश यादवची कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजीची सरासरी ३०.८ आहे.
???? | WELCOME UMESH
Middlesex Cricket is delighted to announce the signing of India international, @y_umesh, for the remaining @CountyChamp matches as well as the @RoyalLondonCup campaign!FULL STORY ⬇️ | #OneMiddlesex
— Middlesex Cricket (@Middlesex_CCC) July 11, 2022
Umesh Yadav will be available to play the County Championship and the Royal London One-Day Cup.
— Cricbuzz (@cricbuzz) July 11, 2022
७५ एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त उमेशने ७ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. उमेश यादवने ७५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०६ विकेट घेतल्या आहेत, त्याची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे ३१ धावांत ४ बळी.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
