🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबतच युवासेना आदित्य ठाकरे देखील वारंवार शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. आदित्य ठाकरेंनी मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढण्यास सुरवात केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी शिंदे गटाला निशाण्यावर धरलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल चढवला आहे.
संजय राऊत म्हणाले कि, शिवसैनिक सदोदित आमच्यासोबत आहे. आम्ही मातोश्रीच्यासोबत आहोत. मातोश्री आमची आई आहे. बाळासाहेब आमची आई आहे. शिवसेना आमची आई आहे. आम्ही आईसोबत गद्दारी करत नाही. बेईमानी करत नाही. लाखो शिवसैनिक आजही मातोश्रीसोबत आहेत. त्यांचे आणि मातोश्रीचे नाते अतूट आहे, त्यामुळे सत्ता असली काय किंवा नसली काय ते मातोश्रीला कधीच सोडणार नसल्याचं राऊत यांनी म्हटले आहे. रोज 15-15 तास बैठका होत असून, प्रत्येक शहरातील शिवसैनिक भेटायला येत आहे, त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कायदेशीर लढाईत सेना कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला माहीत आहे, कोणावर कसा दबाव आणला जातो ते. कायद्याची पायमल्ली सुरू असून, लोकशाहीचा खून करण्याचा मिनिटा मिनिटाला प्रयत्न होतोय. तसेच उद्या होणाऱ्या सुनावणीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही हे उद्या कळेल. आमची न्यायव्यवस्था किती दबावात आहे हे उद्या स्पष्ट होईल असंही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
