🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजप पक्ष पुन्हा एकदा सत्तेत आला. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. त्यानंतर आता राज्यातील विरोधी पक्षाची जागा राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. एकीकडे शिंदे-फडणवीस सरकार हे सामान्य जनतेचे सरकार असल्याचे दाखवत आहे. तर दुसरीकडे विरोधक हे सरकार असं वेदांशील असल्याचे बोलत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे सरकार विमानात फिरतयं, हॉटेलात बसतय आणि अडीच हजारांची दाढी-कटिंग करतय, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
राज्यातील सरकारची स्थापना पाहता हे सरकार अस्थिर असल्याचे समजत आहे. मात्र हे सरकार वारंवार सामान्य जनतेला आपण किती स्थिर आहोत असे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. सत्तेत आलेले नेते स्वतःला जनतेचे सेवक म्हणत आहेत, मात्र यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण केले आहे. बंडखोरी दरम्यान या लोकांचे कारणामे ही सर्वसामान्य जनतेला माहिती आहेत. असा सुप्रिया सुळे मी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच निशाणा साधला.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही एकत्र आल्यामुळे शिवसेना हा आता आमचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा नेहमीच शिवसेनेला पाठिंबा राहणार आहे. आता हे बंद कर आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. मात्र बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांनाच खरा शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवले होते. त्यामुळे त्यांना दुखावणे म्हणजेच बाळासाहेबांना दुखावले असा त्याचा अर्थ होतो. हे सरकार सध्या स्वतःला आपण स्थिर आहोत असे दाखवून देत आहे. मात्र सत्य परिस्थिती अशी नाही. असे यावेळी सुळे म्हणाल्या.
एखाद्या पक्षातून बंद केल्यामुळे सामान्य जनतेचा लोकप्रतिनिधींवरून विश्वास उठला जातो. हे आमदार केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात यांना जनतेच्या प्रश्नांची काहीही देणेघेणे नाही. या आमदारांच्या अशा भूमिकेमुळे सामान्य जनता भरडली जात आहे. मंडप वरी केल्यानंतर यांचा प्रवास एका विमानातून दुसऱ्या विमानात, राहण्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलची सोय, यांच्या दाढी-कटिंगचा खर्च सर्वसामान्य जनतेला कधी समजणार नाही अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
