🕒 1 min read
Ranvir Singh । रणवीर सिंग | मुंबई : सध्या सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण ७’ (Coffee With Karan)ची जोरदार चर्चा आहे. हा शो लोकप्रिय शो आहे. चाहते या शो’ला भरभरून प्रेम देतात. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी करणचे पहिले गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. रणवीरने त्याचं लग्न, बेडरुम सीक्रेट्स आणि सेक्स लाइफबद्दल या शोमध्ये बरेच खुलासे केले. त्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे.
रणवीरने यामध्ये खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. Coffee With Karan 7 शोमध्ये त्यानं व्हॅनिटी व्हॅनमध्ये सेक्स केल्याचाही खुलासा केला. हा खुलासा केल्यानंतर करण जोहरने लगेचचं रणवीरला विचारलं, “हे कसं काय झालं? तुला भीती वाटली नाही का की व्हॅनिटीमध्ये कोणीतरी येईल. मी सुरक्षेबद्दल बोलतोय.” त्यावर आलिया म्हणाली, “त्याने आतून दरवाजा लॉक करून घेतला असेल.” एवढ्यात रणवीर म्हणाला, “असं करताना रिस्क असते, पण ते खूप भारी असतं.”
https://www.instagram.com/p/CftnGRYIW_t/
Coffee With Karan 7 शोमध्ये रणवीर सिंगने हृतिक रोशन, धर्मेंद्र, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि आमिर खान यासारख्या अभिनेत्यांची नक्कल केली. नंतर काही कलाकार ज्या गोष्टींचा विचार करतात त्या गोष्टींचा विचार न करता रणवीर सिंग बिनधास्त बोलताना दिसला.
या शोमध्ये रणवीर आणि आलिया या दोघांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आलियाने देखील तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले. यावेळी आलियाला लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली, “लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी काहीच करत नाही. कारण लग्नाच्या एवढ्या सगळ्या विधी झाल्यानंतर आपण थकलेले असतो”.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
