Share

‘‘तू माझ्या मोठ्या…”, धोनीच्या वाढदिवशी विराट कोहलीनं केलं खास ट्वीट; वाचा काय म्हणाला तो!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि स्टार भारतीय फलंदाज विराट कोहली यांच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. कोहलीने अनेक प्रसंगी धोनीला मोठा भाऊ म्हटले आहे. आज धोनी त्याचा ४१वा वाढदिवस साजरा करत आहे आणि यादरम्यान कोहलीने त्याचा धोनीसाठी एक गोंडस सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. भारतीय संघाची जर्सी आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जर्सीमधील धोनीसोबतचे दोन फोटो शेअर करत कोहलीने खास मेसेज लिहिला.

कोहली म्हणाला, ”एक असा लीडर, त्याच्यासारखं कोणी नाही. तू भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद. तू माझ्या मोठ्या भावापेक्षा जास्त आहेस. तुझ्याबद्दल प्रेम आणि आदर. वाढदिवसाच्या शुभेच्छा कॅप्टन.” २००८ मध्ये कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता.

धोनीच्या नेतृत्वाखाली कोहलीने अनेक सामने खेळले आहेत. धोनीने अचानक कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले, तोपर्यंत त्याने कोहलीला कर्णधारपदासाठी तयार केले होते. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली त्याला खूप मदत केल्याचेही कोहलीने कबूल केले आहे. मर्यादित षटकांचे कर्णधारपद मिळाल्यानंतरही सामन्यादरम्यान कोहली मैदानावर सतत धोनीकडून टिप्स घेत असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळाले.

कर्णधार म्हणून धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अतिशय नेत्रदीपक होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसीची तीनही विजेतेपदे जिंकली आहेत आणि असे करणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने २००७ मध्ये प्रथम टी-२० विश्वचषक जिंकला होता. यानंतर २०११ मध्ये भारताने क्रिकेट विश्वचषक विजेतेपद मिळवून २८ वर्षांचा दुष्काळ संपवला. २०१३ मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवरही कब्जा केला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!