🕒 1 min read
मुंबई : ३९ आमदारानंतर आता खासदार देखील संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटातील नेते करत आहेत. तर आता नगरसेवकही शिंदे गटात दाखल होऊ लागले आहेत. गुरुवारी ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे ठाणे महापालिकेवरील नियंत्रण पूर्णपणे संपले.यावरून आता मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय.
गजानन काळे यांनी ट्विट करत राऊतांना टोला लगावला आहे. ‘चमत्कार बाबा’ संजय राऊतांमुळे ठाणे महापालिकेत आता एकच नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत उरलाय. पक्षप्रमुख आता त्यालाच महापौर करणार वाटतं. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेला आज मोठं भगदाड पडलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अनेक नगरसेवक शिवसेनेतून फुटतील, अशी अपेक्षा होती. मात्र एक नाही दोन नाही तर अवघी उद्धव ठाकरेंची शिवसेनाच रिती झाली, असं म्हणत काळेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.
'चमत्कार बाबा'संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला????
त्याला बहुतेक महापौर करणार आता पक्षप्रमुख …
सौ दाऊद,एक राऊत …????— Gajanan Kale (@MeGajananKale) July 7, 2022
दरम्यान, ठाण्यात शिवसेनेला नव्याने सुरुवात करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्याचे महापौर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी राजीनामा दिला होता. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी काढलेल्या अभिनंदन रॅलीत शहराध्यक्ष राजेश मोरे यांच्यासह १८ माजी नगरसेवकांनी सहभाग घेतला.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
