🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) स्पर्धांमध्ये भारतीय संघाला मिळालेल्या वारंवार अपयशानंतर बीसीसीआय (BCCI) ला आता माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) कडे परत यावे लागत आहे. नुकतच ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी 20 विश्वचषकाच्या पराभवानंतर बीसीसीआय भारतीय टी 20 क्रिकेट सेटअपसह महेंद्रसिंग धोनी याला मोठ्या भूमिकेत नियुक्त करण्याचा विचार करत आहे. बीसीसीआयच्या सूत्रानुसार, धोनीला बोर्ड भारतीय क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी भूमिकेसाठी बोलवण्याचा विचार करत आहे. दरम्यान त्याला ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ या पदी नियुक्त केले जाऊ शकते.
द टेलिग्राफीच्या अहवालानुसार, माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्यावर तिन्ही फॉरमॅटचे व्यवस्थापन करायचा भार खूप जास्त होत आहे. त्यामुळे बीसीसीआय आता प्रशिक्षण पदाची भूमिका विभाजित करण्याच्या विचारात आहे. त्याचबरोबर टी 20 फॉर्मेट मध्ये धोनीचा समावेश करून भारतीय क्रिकेट संघाचा दर्जा उंचवण्याचा विचार देखील बोर्ड करत आहे.
याआधी धोनीने टी 20 विश्वचषक 2021 दरम्यान संघासोबत काम केले होते. आठवड्याभराच्या सहभागानंतर संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता. बीसीसीआय ला वाटत आहे की दोन्ही टी 20 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे बीसीसीआय त्याला नियुक्त करण्याचा विचार करत आहे.
आयपीएल 2023 नंतर धोनी खेळातून निवृत्त होणार असे अनेक रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे. दरम्यान, बीसीसी त्याच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा योग्य वापर करून घेण्यास उत्सुक आहे. त्यामुळे धोनीला काही खेळाडू सोबत काम करण्यास आणि भारतीय टी 20 संघाचे व्यवस्थापन करण्यास सांगू शकते.
महत्वाच्या बातम्या
- Bawankule on Ajit Pawar | “…तर तुम्ही या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही” ; बावनकुळे अजित पवारांना असे का म्हणाले?
- Jitendra Awhad | जामीनानंतर आव्हाडांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सगळं ठरलेलं…”
- Health Tips | लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
- Shivsena | मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली
- Anil Desai | “आठवणींबद्दलच बोलायचंय तर आमच्याकडे 2009 पूर्वीच्या…”; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल देसाईंची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
