Share

Deepak Kesarkar : ‘मातोश्री’वर बोलवलं तर जावू, पण भाजपशी संवाद ठेवावा लागेल; दीपक केसरकरांनी घातली अट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिंदे गटाची ताकत सध्या वाढत आहे. तर शिवसेना मात्र धक्के बसत आहेत. ३९ आमदारानंतर आता खासदार देखील संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटातील नेते करत आहेत. तर आता नगरसेवकही शिंदे गटात दाखल होऊ लागले आहेत. गुरुवारी ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे ठाणे महापालिकेवरील नियंत्रण पूर्णपणे संपले. त्यातच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

‘मातोश्री’वरून बोलवणं आलं तर जाल का असा प्रश्न केसरकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर केसरकर म्हणाले की, आम्ही आता सत्तेमध्ये भाजपसोबोत आलोत. एक कुटुंब तयार झालं. आम्ही आता एकटे नसून आमच्या कुटुंबात आता भाजप आहे. नवीन कुटुंब तयार झालं आहे. आम्हाला मातोश्रीवर बोलताना त्यांना भाजपला देखील बोलवावं लागेल, अशी अट केसरकर यांनी मातोश्रीवर जाण्यासंदर्भात ठेवली आहे. तसेच केसरकर यांनी मातोश्रीजवळ असलेली चौकडी बाजू करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, एकीकडे शिवसेनेच्या आमदारांनी साथ सोडलेली असताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडसूळ यांनी राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. आनंदराव अडसूळ यांच्या कठीण काळात शिवसेना पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. तसेच ईडीने केलेल्या कारवाई दरम्यान आणि आजारपणात शिवसेना नेतृत्वाने साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत अडसूळ यांनी ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!