🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज त्याचा ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त धोनीचे करोडो चाहते अभिनंदन करत आहेत. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला धोनीनेही स्टेडियममध्ये जाऊन विम्बल्डन सामन्याचा आनंद लुटला. धोनीने राफेल नदाल आणि टेलर फ्रिट्झ यांच्यातील सामन्याचा आनंद लुटला. आयपीएलमध्ये त्याची फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जने त्याचे फोटो शेअर केले आहेत.
खास गोष्ट म्हणजे विम्बल्डननेही धोनीचा फोटो शेअर केला आणि एक भारतीय आयकॉन हा सामना पाहत असल्याचे सांगितले. धोनी हा विम्बल्डन सामना पाहणारा एकमेव भारतीय नव्हता. दिग्गज माजी सलामीवीर सुनील गावसकरही तेथे उपस्थित होते आणि लाइव्ह सामन्याचा आनंद घेत होते.
Indian Cricket waking upto to this! #MSDhoni at #Wimbledon2022 https://t.co/q49JgHnsJ7
— Karamdeep (@oyeekd) July 7, 2022
12.45 am in India and all eyes on screens. In the stands we have MS Dhoni and Sunil Gavaskar cheering for Indian star- Sania Mirza.#Wimbledon #Wimbledon2022 pic.twitter.com/ToS7oylrXQ
— Karamdeep (@oyeekd) July 6, 2022
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनीने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे यश संपादन केले आणि भारतीय संघाला नवीन उंचीवर नेले. तो जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. धोनीच्या नेतृत्वाखाली या संघाने २००७ मध्ये पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला होता. यानंतर त्याने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
याशिवाय धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने २००८ मध्ये त्याच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून तो सतत खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
