Share

Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान मॅचसाठी सज्ज व्हा; ‘या’ तारखेला होणार महामुकाबला!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेचे आयोजन देशातच करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी, देशात सुरू असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर यूएईमध्ये आशिया कप होण्याची चर्चा होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात झाला होता. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने भारतावर १० गडी राखून मात केली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने या स्पर्धेमुळे दोन्ही संघ महत्त्वाच्या खेळाडूंना संधी देऊ शकतात.

श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ऍशले डी सिल्वा यांनी सांगितले, ”स्पर्धेचे सामने वेळापत्रकानुसारच होतील. त्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेलाही आम्ही तयार केले आहे.” मिळालेल्या माहितीनुसार, आशिया कप टी-२० स्पर्धा २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २८ ऑगस्टला होऊ शकतो. भारत या स्पर्धेचा गतविजेता आहे. याआधी क्वालिफायरचे सामने खेळवले जातील.

चालू मोसमात आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. २१ ऑगस्टपासून पात्रता फेरीचे सामने सुरू होतील. यामध्ये यूएई, ओमान, नेपाळ, हाँगकाँगसह अन्य संघ प्रवेश करतील. यातील एक संघ मुख्य ड्रॉसाठी पात्र ठरेल. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांना मुख्य ड्रॉमध्ये आधीच स्थान मिळाले आहे. २०१८ मध्ये यूएईमध्ये शेवटच्या वेळी आशिया कपचे सामने झाले होते. अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव करून भारताने सातव्यांदा विजेतेपद पटकावले.

आशिया चषक स्पर्धेचे सामने आधी वनडे फॉरमॅटमध्ये खेळवले जात होते. २०१६मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा टी-२० फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आली. पाकिस्तानला दोन वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावता आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!