Share

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस यांचा गडकरींना वाकून नमस्कार, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नागपूरमध्ये भेट झाली. महाराष्ट्रात नुकतेच शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. या सगळ्या सत्तानाट्ट्यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिल्लीत होते. दिल्लीत असणारे नितीन गडकरी हे बुधवारी नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी नागपूरमध्ये असलेले नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांची नागपूर विमानतळावर भेट घेतली.

या भेटी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांना अगदी वाकून नमस्कार केला. देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांना अगदी कमरेत लवून नमस्कार केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अगदी कमी कालावधीत भारतीय जनता पक्षामध्ये आपल स्थान निर्माण केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे भविष्यात केंद्रातील महाराष्ट्राचा प्रमुख चेहरा असतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच केंद्रीय नेतृत्वांच्या आदेशामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून त्यांचं वर्चस्व कमी केलं असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं.

देवेंद्र फडणवीस हे भविष्यात केंद्रातील भाजप सरकारमध्ये प्रमुख पदांसाठीचे दावेदार असू शकतात. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर बसवून त्यांचे राजकीय खच्चीकरण केल्याचे बोलले जात आहे. मध्यंतरीच्या काळात नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे पुढील उमेदवार असतील, अशीही चर्चा रंगली होती. परंतु, मोदी-शाह जोडीने संभाव्य स्पर्धा टाळण्यासाठी नितीन गडकरी यांना कायमच निर्णयप्रक्रिया आणि महत्त्वाच्या खात्यांपासून दूर ठेवल्याचे बोलले जाते. तरीही गडकरी यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. आता नागपूरमध्ये फडणवीस आणि गडकरींमध्ये काही चर्चा होते का, याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!