🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. 30 जून रोजी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला बोलावावे, असं पत्र फडणवीसांनी दिले आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरूवारी) पर्यंत राज्यपालांनी मुदत दिली आहे.
यानंतर उद्याच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था बिघडू नये याकरिता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना १४९ ची नोटीस पाठवली आहे.उद्या एकनाथ शिंदे गट मुंबईत दाखल होणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. यानंतर उद्या काय होणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आज सकाळी एकनाथ शिंदे म्हणाले म्हणाले होते कि, “आम्ही उद्या मुंबईत पोहोचणार आहोत. आमच्याकडे ५० आमदार आहेत. दोनतृतियांशपेक्षा जास्त बहुमत आमच्या शिवसेना गटाकडे आहे. त्यामुळे उद्या बहुमत चाचणीत आम्ही पास होणार आहोत. आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी देखील आम्ही जाणार आहे. लोकशाहीत संख्या महत्त्वाची असते. या देशात राज्यघटना आणि कायद्याच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
