🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तेव्हापासून रोहितच्या बर्मिंगहॅम कसोटीत खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रोहितला डॉक्टरांच्या देखरेखीखाली हॉटेलच्या खोलीत क्वारंटाइन करण्यात आले आहे. या सगळ्यामध्ये रोहित शर्माने सोमवारी रात्री त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये तो हसताना दिसत आहे. यानंतर आता रोहित इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळू शकेल, अशी आशा चाहत्यांना आहे.
रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळणार की नाही याचा निर्णय ३० जूनला होणार आहे. रोहितची आरटीपीसीआर चाचणी ३० जून रोजी पुन्हा केली जाणार आहे. या चाचणीत रोहितचा अहवाल निगेटिव्ह आल्यास तो बर्मिंगहॅम कसोटीत खेळू शकेल. एजबॅस्टन कसोटीसाठी भारतीय संघ मंगळवारी २८ जून रोजी बर्मिंगहॅमला रवाना होणार आहे.
https://twitter.com/TrollMIHaterTV_/status/1541450858575331329
जर रोहित शर्मा कसोटीसाठी संघात परतला नाही तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो. याआधी रोहित शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्रांती देण्यात आली होती, त्यावेळी केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते पण दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर पडला होता आणि ऋषभ पंतला कर्णधारपद देण्यात आले होते. आफ्रिकेविरुद्धची ही मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
