🕒 1 min read
मुंबई : इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन कालपासून चर्चेचा विषय ठरला आहे. मॉर्गन मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, असे अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना, इंग्लंडच्या कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम म्हणाला, ”मॉर्गनने एक लीडर म्हणून जबरदस्त कामगिरी केली आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली कर्णधारांपैकी एक आहे.” मॅक्युलम आणि मॉर्गन या जोडीने आयपीएलमध्ये एकत्र काम केले आहे.
मॅक्युलम म्हणाला, ”इऑन मॉर्गन हा इंग्लंडचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर त्याने जे काही केले यावरून जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळखला जाणार आहे. त्याने क्रिकेटची संपूर्ण दृष्टिकोन आणि शैलीच बदलून टाकली. जोस बटलर, बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो सारखे लोक सध्या जागतिक क्रिकेटमध्ये परिपूर्ण सुपरस्टार आहेत. सर्व चांगल्या गोष्टींचा अंत झाला पाहिजे आणि एक वेळ येईल जेव्हा तो आणि मी बसून त्याची कारकीर्द किती उल्लेखनीय आहे यावर विचार करू.”
मॉर्गनची बॅट बर्याच दिवसांपासून शांत आहे आणि त्यामुळे त्याच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. अलीकडेच मॉर्गन नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेत तो खातेही उघडू शकला नाही. त्याचवेळी दुखापतीमुळे तो गेल्या सामन्यात सहभागी झाला नव्हता. अशा परिस्थितीत संघाचे हित लक्षात घेऊन त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
