Share

Sandip Deshpande : बाळासाहेबांचे नाव न वापरण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला मनसेचा टोला 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २५ जून रोजी शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती होते. यावेळी शिवसेनेने पाच महत्वाचे ठराव मंजूर केले असून त्यापैकी बाळसाहेब ठाकरे नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही असा महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला होता. आता उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यंगचित्र शेअर करत टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत पाच ठराव मंजूर केले आहेत. यामध्ये बाळासाहेब ठाकरे व शिवसेना हे नाव वापरता येणार नाही असा ठराव मंजूर केला आहे, या पाश्वर्भूमीवर संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. “बाबा, आपण आजोबांचं नाव न वापरण्याचा ठराव केला. पण तुमचं नाव न वापरण्याचा ठराव का करत नाही?” असे म्हणत व्यंगचित्र ट्विट केले आहे.

 

शिवसेनेचे पाच ठराव-

राष्ट्रीय बैठकीत पाच ठराव मंजूर झाले आहेत. त्यापैकी पहिला ठराव म्हणजे सर्व अधिकार हे पक्ष प्रमुखांकडे असतील. म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे असतील. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि राहणार त्यामुळे बंडखोर आमदारांनी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. तिसरा ठराव म्हणजे शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पक्षप्रमुखांना अधिकार असतील. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कुणाला वापरता येणार नाही. सेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील. असे पाच ठराव या बैठकीत मंजूर झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!