Share

IRE vs IND : हार्दिक पंड्याचा विक्रम; भारताचा कप्तान म्हणून केली ‘अशी’ कामगिरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने कर्णधार म्हणून आयर्लंडविरुद्धच्या (IRE vs IND) मालिकेची विजयी सुरुवात केली. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने आयर्लंडचा ७ गडी राखून पराभव केला. या मालिकेत फक्त दोन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. दुसरा टी-२० सामना २८ जून रोजी होणार आहे. या सामन्यात उमरान मलिकनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून केवळ हा सामना जिंकला नाही तर एक नवा विक्रमही प्रस्थापित केला जो यापूर्वी कोणताही भारतीय कर्णधार टी-२० मध्ये करू शकला नाही.

या सामन्यात पंड्याने २ षटकात २६ धावा देत एक विकेट घेतली. पंड्या महागडा ठरला पण या विकेटसह तो टी-२० मध्ये विकेट घेणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही.

सामन्यानंतर हार्दिक म्हणाला, ”विजयाने मालिकेची सुरुवात करणे खूप छान आहे, नशीब चांगले होते की आज सामना होऊ शकला. आमच्या संघासाठी विजयाने सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. उमरानशी बोललो. त्याला जुन्या चेंडूने गोलंदाजी करणे सोयीचे वाटते.”

या सामन्यात भारतासाठी अनेक गोष्टी चांगल्या झाल्या. सलामीवीर दीपक हुडाने शानदार फलंदाजी करत २९ चेंडूत ४७ धावा करत संघाला लक्ष्यापर्यंत नेले. इशान किशननेही २६ धावांची छोटी पण प्रभावी खेळी खेळली. भारताकडून दिनेश कार्तिकने नाबाद ५ धावा केल्या. २८ जून रोजी दुसरा टी-२० सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!