🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केल्याचे बोलले जात असले तरी, यामुळे शिंदे यांनी मनसेशी गाठ बांधण्याच्या दृष्टीने चर्चा केली असल्याच्या चर्चा राजकारणात रंगत आहेत. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी मनसेला टोला लगावला आहे.
“गुजराती मध्ये एक म्हण आहे… ‘ના મામા કરતાં કાનો મામો સારો’ एकनाथ शिंदे यांचा मनसेला संपर्क करणे म्हणजे हीच म्हण. आता गुजरातीमधील ही म्हण समजून घ्यायला मनसे आणि एकनाथ शिंदे समर्थकांना भाजप मदत करेल.”, असे ट्वीट करत क्लाईड क्रास्टो यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
गुजराती मध्ये एक म्हण आहे…
'ના મામા કરતાં કાનો મામો સારો'
एकनाथ शिंदे यांचा मनसेला संपर्क करणे म्हणजे हीच म्हण.
आता गुजरातीमधील ही म्हण समजून घ्यायला मनसे आणि एकनाथ शिंदे समर्थकांना भाजप मदत करेल.#Eknath_Shinde #BJP #MNS #RajThackeray— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो ???????? (@Clyde_Crasto) June 27, 2022
दरम्यान यावरच शिवसेना खासदार संजय राउत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “बंडखोर आमदार AIMIM, समाजवादी पक्षातही जाऊ शकतात. आमदारकी वाचवायची असेल तर ते अशा पक्षात जाऊ शकतात. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला त्याचा द्वेष करत असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही. बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणर असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Subhash Sabne : “ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना अटक केली त्यांच्या मांडीला मांडी लावून…”, सुभाष साबणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- Siddharth Jadhav : घटस्फोटाच्या चर्चेत सिद्धार्थ जाधवने केला पत्नी सोबत फोटो शेअर, पाहा PHOTO
- Sanjay Raut : “आम्ही मरू पण पार्टी सोडणार नाही” ; संजय राऊतांचं वक्तव्य
- Jug Jug Jeeyo : ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाची ३ दिवसात धमाकेदार कमाई
- Sanjay Raut VS MNS : “बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर…”, संजय राऊतांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
