🕒 1 min read
मुंबई : मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना (Ranji Trophy 2022 Final) खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवशी मुंबईचा स्फोटक फलंदाज सरफराज खानने शानदार शतक झळकावले. सरफराज खानने १९० चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. सरफराजने या मोसमात ९००हून अधिक धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच गौरव यादवने शम्स मुलाणीला बाद करत मुंबईला सहावा धक्का दिला. मात्र, सरफराजने एक बाजू ढासळू दिली नाही. या हंगामातील त्याचे हे चौथे शतक ठरले.
शतक झळकावल्यानंतर सरफराजने आपल्या सेलिब्रेशनद्वारे पंजाबचा गायक सिद्धू मुसेवालाला श्रद्धांजली वाहिली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयच्या डोमेस्टिक ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सर्फराजने मध्य प्रदेशविरुद्ध १९० चेंडूत शतक झळकावले आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. हे शतक अशा वेळी आले आहे जेव्हा मुंबईच्या संघाला त्याची गरज होती. रणजी ट्रॉफीच्या ८७ वर्षांच्या इतिहासात दोन हंगामात ९००हून अधिक धावा करणारा सरफराज खान हा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी हा पराक्रम वसीम जाफर आणि अजय शर्मा यांनी केला होता.
The celebration from Sarfaraz Khan is an absolute pleasure to watch. pic.twitter.com/QamNJ5Ua7g
— Johns. (@CricCrazyJohns) June 23, 2022
मुंबईने पहिल्या डावात ३७४ धावा केल्या आहेत. मुंबईकडून सरफराजने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २४३ चेंडूत १३४ धावांची खेळी केली. तत्पूर्वी, सलामीवीर पृथ्वी शॉने ४७ आणि यशस्वी जयस्वालने ७८ धावांचे योगदान दिले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अरमानने २६ धावा केल्या. मध्य प्रदेशकडून गौरव यादवने ४ बळी घेतले. त्याचवेळी अनुभव अग्रवालने मुंबईच्या ३ फलंदाजांना बाद केले.
ही फायनल मध्य प्रदेशसाठी खूप महत्त्वाची आहे. रणजीच्या इतिहासात मध्य प्रदेशने या देशांतर्गत स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे ते जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
