Share

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मानं पूर्ण केली १५ वर्षे; ट्वीट करत म्हणाला….

Published On: 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या इंग्लंडमध्ये १ जुलैपासून खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण केली असून यानिमित्ताने त्याने ट्विटरवर एक पत्र पोस्ट करत त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. रोहितने २३ जून २००७ रोजी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताने हा एकदिवसीय सामना एकतर्फी जिंकला. या सामन्यात रोहितला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

रोहितने ट्विटरवर पोस्ट केलेल्या पत्रात लिहिले, ”आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण करत आहे. हा प्रवास आयुष्यभर जपत राहीन. माझ्या प्रवासाचा भाग असलेल्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो आणि विशेषत: त्यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांच्यामुळे मी असा खेळाडू बनलो आहे. सर्व क्रिकेटप्रेमी, चाहते आणि समीक्षकांचे प्रेमच आम्हाला सर्व अडथळे पार करण्यास मदत करते.”

१ जुलैपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात रोहित भारताचे नेतृत्व करेल. हा सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे. या मालिकेतील हा पाचवा कसोटी सामना आहे. याआधी २०२१ मध्ये भारतीय संघाने ४ सामने खेळले होते. त्यावेळी भारतीय संघात कोविडची प्रकरणे समोर आल्याने मालिका रद्द करावी लागली होती. या मालिकेत भारतीय संघाने २-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!