🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक अट ठेवत ‘मी राजीनाम देणार’ असल्याचे सांगितले. या पाश्वर्भूमीवर नाना पाटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“ज्यांना मी नको आहे, त्यांनी तसे येऊन सांगावे किंवा फोनवर बोलावे”,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले. या पाश्वर्भूमीवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मा. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असण्याबाबद कॉंग्रेसचा अजिबात विरोध नाही. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय मा. उद्धव ठाकरे घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल”, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय मा. उद्धव ठाकरे घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल.#Maharashtra pic.twitter.com/JbGio5gxli
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 23, 2022
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
दरम्यान या राजकीय गदारोळावर उद्धव ठाकरे यांनी काल (२२ जून) रोजी आपली भूमिका मांडली आहे. “शिवसेनेच्या आमदारांनी मला येऊन सांगावं की, तुम्ही मुख्यमंत्री नकोय आम्हाला. फक्त समोर येऊन सांगावं किंवा माध्यमांच्या सहाय्याने संवाद साधला तरी चालेल पण मी मुख्यमंत्री नकोय असे जेव्हा ते त्यांच्या तोंडून सांगतील त्या क्षणी मी राजीनामा देईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
