🕒 1 min read
मुंबई : विराजस कुलकर्णी हा छोट्या पडद्यावरील अभिनेता आहे. हा अभिनेता ‘माझा होशील ना’ या मालिकेमधून घराघरात पोहचला आहे. मागच्या महिन्यात विराजस अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे. सध्या तो शिवानी सोबत टाइम घालवताना दिसत आहे. विराजसने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.
विराजस हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याने नुकताच इन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये, कारण अधून मधून उठावं लागतं”. सध्या या पोस्टच्या सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहेत. ही पोस्ट पाहून चाहते वेगवेगळे तर्क वितर्क लावताना दिसत आहेत. सोशल मीडिया युजर्सने कमेंट करत त्याची खिल्ली उडवली आहे. “लग्न झालं आता तुझं, आता असचं होणार, नवीन लग्न झालं की अधून मधून रात्री उठणं स्वाभाविकच आहे”. अशा अनेक कमेंट सोशल मीडिया युजर्सने केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/Ce8q1vUpfpN/
दरम्यान, विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे दोघे ३ मे २०२२ रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर दोघांनी लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/p/CeUGvluvxBS/
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
