🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ सध्या मायदेशात प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळला जाणार आहे. भारतीय संघाने राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ८२ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिकेच्या काही खेळाडूंनी भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या घरी जेवण केले. या सर्वांनी सोबत बसून चित्रपटही पहिला आहे.
जयदेव उनाडकट सध्या भारतीय संघाचा भाग नसला तरी त्याने आपल्या सहकारी खेळाडूंना घरी मेजवानीसाठी आमंत्रित केले होते. इंस्टाग्रामवर पोस्ट आणि स्टोरी शेअर करत जयदेव उनाडकटने त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांबद्दल माहिती दिली आहे. या सर्व खेळाडूंनी एकत्र चित्रपट आणि पार्टीचा आनंद लुटला. भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार ऋषभ पंत, अक्षर पटेल, इशान किशन, आवेश खान, हार्दिक पंड्या यांच्यासह भारतीय संघाचे खेळाडू त्याच्या घरी जेवणाला उपस्थित होते.
पोस्ट करताना उनाडकटने कॅप्शनमध्ये असेही लिहिले की, ‘ स्टार खेळाडूंसोबत एक फोटो, डिनरनंतरचे फोटो.’ त्याच्या पोस्टवर टिप्पणी करताना भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने आपली प्रतिक्रिया दिली. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेन पारनेलने त्यांना आमंत्रित केल्याबद्दल आभार मानले आहेत.
https://www.instagram.com/p/Ce843FvMUT-/?igshid=YmMyMTA2M2Y=
जयदेव उनाडकट शेवटचा भारतीय संघासाठी २०१८ मध्ये श्रीलंकेत बांगलादेश विरुद्धच्या निदाहस ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिसला होता. तेव्हापासून तो पुन्हा भारतीय संघात दिसलेला नाही. पण आयपीएलमध्ये तो अनेक संघांकडून सतत खेळत आहे. आयपीएल २०२२ पूर्वी झालेल्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्स संघाने जयदेव उनाडकटचा आपल्या संघात समावेश केला होता.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
