🕒 1 min read
मुंबई : भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी पनवेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधलाय. सध्या ते मावळ लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जहरी शब्दांत टीका केलीय.
मोदींचे फोटो वापरून आदित्य ठाकरेंसह आमदार खासदार निवडून आले आणि आता मोदी विरोधकांशी हातमिळवणी केली. ही महाराष्ट्राच्या मतदारांशी केलेली गद्दारी आहे, अशी टीका जावडेकर यांनी केली. भविष्यात मावळ लोकसभा मतदार संघात भाजपचा खासदार असेल असेही जावडेकर म्हणाले. तर आम्ही राज्यातले ४८ पैकी ४८ जागा जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
