🕒 1 min read
मुंबई : देशात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपासून आपल्याला कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात १३ हजार २१६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य तज्ज्ञांनी चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
देशामध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ६८ हजारांवर गेली आहे. भारतात सध्या ६८ हजार १०८ करोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. आत्तापर्यंत एकूण ४ कोटी २६ लाख ९० हजार ८४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८. ६३ टक्क्यांवर पोहचले आहे. तर गेल्या २४ तासात ८ हजार १४८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
महारष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. महारष्ट्रामध्ये मागच्या महिन्यापासून कोरोना रुग्णाच्या संख्येत जास्त प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मागच्या ३ दिवसांपासून ४ हजारापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ४ हजार १६५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
