Share

राशिद खान बनला ‘क्रिकेटचा अक्षय कुमार’, ‘या’ कारणामुळे चाहते करत आहेत जोरदार कौतुक; पाहा!

Published On: 

🕒 2 min read

मुंबई : राशिद खानने आपल्या कामगिरीने आपण जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचे दाखवून दिले आहे. रशीद हा असा क्रिकेटर आहे जो जगातील प्रत्येक क्रिकेट लीगमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी राहिला आहे. सतत क्रिकेट खेळूनही राशिदला दुखापत होत नाही आणि तो कधी विश्रांतीही घेत नाही. ही त्याच्या स्वतःसाठी एक मोठी गोष्ट आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये जिथे नेहमीच क्रिकेटपटूंना दुखापतीचा धोका असतो. तिथे मात्र रशीदने स्वत:ला तंदुरुस्त ठेवत आहे. त्याने हे सिद्ध केले आहे की तो जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी आणि तंदुरुस्त खेळाडू आहे. कारण त्यांची आकडेवारी या वस्तुस्थितीची साक्ष देणारी आहे. त्यांचे आकडे पाहून तुम्हीही दाताखाली बोट दाबाल.

रशीदने २०२१-२२ बिग बॅश लीगमध्ये ११ सामने खेळले आहेत. त्यानंतर लगेचच तो नेदरलँड्सविरुद्ध आपल्या देशासाठी ३ वनडे सामने खेळताना दिसला. त्याच वेळी राशिदने पाकिस्तान सुपर लीग २०२२ मध्ये ९ सामने खेळले. तेथून तो थेट बांगलादेशविरुद्ध ३ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळला. याशिवाय रशीदने आयपीएल २०२२ मध्ये एकूण १६ सामने खेळले आहेत. यादरम्यान अफगाणिस्तानचा हा फिरकीपटू अजिबात थकलेला दिसला नाही. राशिद संपूर्ण स्पर्धा मोठ्या सहजतेने खेळताना दिसला आहे.

आयपीएल २०२२ संपल्यानंतर राशिद आपल्या देशाकडून झिम्बाब्वेविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळताना दिसला. आता झिम्बाब्वेविरुद्धची मालिका संपली असताना, हा मिस्ट्री स्पिनर टी-२० ब्लास्टमध्ये आपली चमक दाखवण्यासाठी पोहोचला आहे. रशीद यावेळी टी-२० ब्लास्टमध्ये ससेक्स संघाचा भाग आहे. राशिद खानचे हे आकडे पाहून त्याला रशीदला ‘करामती’ खान का म्हणतात हे सिद्ध झाले आहे.

काही चाहते असेही म्हणत आहेत की, राशिद जास्त कसोटी खेळत नाही. त्यामुळे तो न थकता सतत क्रिकेट खेळू शकतो. मात्र सतत क्रिकेट खेळून रशीदने जागतिक क्रिकेटला नक्कीच चकित केले आहे.

https://www.instagram.com/reel/Ce59oQWoCHo/?igshid=YmMyMTA2M2Y=

राशिद खानची कारकीर्द (आतापर्यंत)
५ कसोटीत ३४ बळी
८३ एकदिवसीय सामन्यात १५८ बळी
६१ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १०९ बळी
३३१ टी-२० सामन्यात एकूण ४५९ बळी

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!