🕒 1 min read
मुंबई : यूएई (UAE) महिला संघ २०२३ आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक (U19 Womens T20 World Cup)च्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या संघाने आशिया क्वालिफायर स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आणि गटात अव्वल स्थान मिळवताना विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात यश मिळविले. ३ ते ९ जून दरम्यान खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत यूएईव्यतिरिक्त थायलंड, नेपाळ, मलेशिया, कतार आणि भूतान या देशांच्या महिला संघांनीही सहभाग घेतला होता. अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत १६ संघ खेळताना दिसणार आहे, यापैकी १३ संघ निश्चित करण्यात आले आहेत.
या स्पर्धेसाठी १२ संघ आधीच पात्र झाले होते. आता यूएई हा प्रादेशिक पात्रतेद्वारे पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. उर्वरित तीन संघांचाही निर्णय प्रादेशिक पात्रतेद्वारे होईल. युएई संघाने सर्व सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनी पाच सामने खेळले आणि सर्व जिंकले.
ICYMI ……
Emirates Cricket's U19 Women's Cricket team are @ICC U19 Women's T20 World Cup (2023) bound ???????????????????? pic.twitter.com/u3lvWDw0NV
— UAE Cricket Official (@EmiratesCricket) June 10, 2022
यूएईचा पहिला सामना भूतान संघाविरुद्ध होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संघाने २०२/१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भूतानचा संघ ४२/७ धावाच करू शकला आणि त्यांना १६० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या सामन्यात यूएईने नेपाळच्या संघाला अवघ्या ८ धावांवर गारद केले. यानंतर अवघ्या सात चेंडूत ९ धावा करत सामना १० गडी राखून जिंकला. तिसऱ्या सामन्यात यूएईने मलेशियावर नऊ गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना मलेशियाने नऊ गडी गमावून ३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूएईने एका विकेटच्या मोबदल्यात ३४ धावा करून सामना जिंकला.
चौथ्या सामन्यात यूएईचा सामना कतार संघाशी झाला. या सामन्यात कतारने प्रथम फलंदाजी करताना ४९/८ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईने सहाव्या षटकात एकही विकेट न गमावता ५२ धावा करून विजयाची नोंद केली. पाचव्या सामन्यात थायलंडचा संघ यूएईसमोर होता. या सामन्यात थायलंडने प्रथम फलंदाजी करताना ८४/८ धावा केल्या. प्रत्युत्तरात युएईने चार गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
