🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या कारागृहात आहेत. यांनी राज्यसभेसाठी मतदान करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पण न्यायालयाने नकार दिला होता. दरम्यान विधानपरिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मिळवण्यासाठी मलिक आणि देशमुखांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांचा हा प्रयत्नही फसला आहे.
आज मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांची विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. या विषयावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “कोर्टाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण काय करतंय हे सर्वांना माहीत आहे. त्यांना बेकायदेशीरपणे कारागृहात ठेवण्यात आले आहे. राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठी मतदानाचा अधिकार त्यांना लोकशाहीने दिला आहे.”
राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार गमावल्यानंतर नबाव मलिक आणि अनिल देशमुख यांनी विधान परिषद निवडणुकीत मतदानाच्या अधिकाराबाबत पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका पुन्हा फेटाळल्याने त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही नेते न्यायालयीन कोठडीत आहेत. अंमलबजावणी संचालनालय नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करत आहे. इडीने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अर्जांना विरोध केला होता.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 रिक्त जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. यामध्ये एकूण 11 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजप, शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहेत. पुरेशा मतांच्या अभावी दोन्ही पक्ष आणि विरोधी पक्षांना क्रॉस व्होटिंग होण्याची भीती आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
