Share

CSKचा ‘युवा’ क्रिकेटर चढला बोहल्यावर; यलो आर्मीनं शेअर केला लग्नाचा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) स्टार क्रिकेटर सी हरी निशांत विवाहबंधनात अडकला. CSK फ्रेंचायझीने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर करून त्याचे अभिनंदन केले. निशांतला अजून आयपीएलमध्ये पदार्पण करायचे आहे. पण तो तामिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये नियमित खेळतो. सीएसकेने हरी निशांतचा सलामीवीर म्हणून संघात समावेश केला. पण रॉबिन उथप्पासह डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या सलामीच्या जोडीमुळे त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला पदार्पण करता आले नाही.

हरी निशांतच्या लग्नाचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यलो आर्मीने नवविवाहित जोडप्याला अभिनंदनाचा संदेश दिला आहे. व्हिडिओ पोस्ट करत CSKने लिहिले, ‘हरीचे लग्न झाले आहे, आता आम्ही तुम्हाला सुपर कपल म्हणून संबोधतो.’ CSK ने शेअर केलेला हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

हरी निशांत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फक्त एकच सामना खेळला आहे. २५ वर्षीय हरी निशांतने २०२०-२१ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कामगिरी केली. त्याने ४१च्या सरासरीने २४६ धावा केल्या. याशिवाय अंतिम फेरीत निशांतने ३५ धावा केल्या. त्याचा बालपणीचा मित्र आणि CSKचा फलंदाज एन जगदीसन याच्यासमवेत त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली. जगदीशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक ३६४ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!