Share

IND vs SA : दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भुवनेश्वर कुमार म्हणतो, “गेल्या सामन्यात आमची…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा ७ गडी राखून पराभव झाला होता आणि आता आज रविवारी कटक येथे दोन्ही देशांमधील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला पुनरागमन करणे आवश्यक आहे, पण पाहुण्या संघाने दिल्लीत ज्या प्रकारचा खेळ दाखवला होता, ते पाहता आव्हान सोपे असणार नाही.

दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पत्रकार परिषदेत संघाच्या अनेक पैलूंवर चर्चा केली आणि पहिल्या सामन्यात आमची गोलंदाजी चांगली नव्हती, असे सांगितले. आता दुसऱ्या सामन्यात चांगली गोलंदाजी करून मालिकेत पुनरागमन करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. मात्र, पुन्हा एकदा पहिल्या सामन्याप्रमाणेच फलंदाजी करावी लागणार आहे.

आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना भुवी म्हणाला, ”मला अजून चांगली कामगिरी करायची आहे. पॉवरप्लेदरम्यान विरोधी फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी माझी आहे आणि एक वरिष्ठ गोलंदाज म्हणून संघातील इतर गोलंदाजांना जी काही मदत लागेल ती मी करेन. संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर त्याचे श्रेय नक्कीच कर्णधाराला जाईल. गेल्या सामन्यात आमची गोलंदाजी चांगली नव्हती, प्रत्येक सामना जिंकणे सोपे नसले तरी आम्ही गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली केली तर या मालिकेत विजय मिळवू.”

मैदानाबाबत बोलताना भुवी म्हणाला, “कटकमधील मैदान लहान आहे आणि त्यामुळे आम्हाला खास रणनीतीने मैदानात उतरावे लागेल. लहान मैदाने ही नवीन गोष्ट नाही कारण आयपीएलमध्येही आपण अनेकदा छोट्या मैदानांवर सामने खेळतो. मैदानाच्या परिस्थितीनुसार आपण सामना खेळून जिंकणे महत्त्वाचे आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!