Share

“पंकजा मुंडेंना दुर्लक्षित करणे हा पण त्याच रणनीतीचा…”, ‘राष्ट्रवादी’चा फडणवीसांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे  संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भाजपने ‘चाणक्य’ ची उपमा देत त्यांना विजयाचे श्रेय दिले. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.

“भाजप देवेंद्र फडणवीस यांना ‘चाणक्य’ ची उपमा देत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र भाजपची रणनीती तेच ठरवत आहेत. तर मग पंकजा मुंडे ताई यांना दुर्लक्षित करणे हा पण त्याच रणनीतीचा भाग आहे हे गृहीत धरायचे का?”, असा सवाल क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत केला आहे.

दरम्यान राज्याच्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा झाली आहे. यामध्ये विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संघटक श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे आणि भाजप नेते प्रसाद लाड या पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. यात विशेष बाब म्हणजे घटक पक्षाचे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांना डावलण्यात आले आहे. भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांना देखील भाजपने नारळ दिला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!