Share

IND vs SA : आज रंगणार दुसरी टी-२० मॅच..! पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला शेवटच्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) पराभव पत्करावा लागला. आज दोन्ही संघात दुसरा सामना रंगणार आहे. डेव्हिड मिलर आणि रासी व्हॅन डर ड्युसेन यांच्या झंझावाती खेळीमुळे आफ्रिकन संघाने पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा सात विकेट्सने पराभव केला. मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी केएल राहुल दुखापतग्रस्त झाला आणि ऋषभ पंतकडे अचानक कर्णधारपद आले. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या युवा खेळाडूंसोबतच पंतच्या कर्णधारपदाचीही कसोटी लागणार आहे.

पंतच्या कर्णधारपदाबद्दल काहीही सांगणे खूप घाईचे आहे. कर्णधारपदाच्या पदार्पणात तो दडपणाखाली दिसला. त्याने आयपीएलच्या ‘पर्पल कॅप’ विजेत्या युझवेंद्र चहललाही कमी गोलंदाजी दिली, जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चहलने फक्त दोन षटके टाकली.
हार्दिक पंड्याने आपला आयपीएलमधील फॉर्ण कायम राखला. पंड्याने पहिल्या सामन्यात १२ चेंडूत नाबाद ३१ धावा करत २०० धावांचा टप्पा पार केला पण गोलंदाजीत तो छाप पाडू शकला नाही. त्याने आपल्या एकमेव षटकात १८ धावा दिल्या. पंतसाठी सर्वात मोठी डोकेदुखी गोलंदाजी असेल ज्यामध्ये त्याला अर्शदीप आणि वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांच्यात निर्णय घ्यावा लागेल.

संघ खालीलप्रमाणे आहेत.

भारत : ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार ), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्किआ, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी व्हॅन डर ड्यूसेन, मार्को यान्सेन.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!