Share

‘कभी ईद कभी दिवाली’या चित्रपटाच्या सेटवर भाईजानला सुरक्षा! ‘अशी’ घेतली जाते काळजी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. मिळालेल्या धमकीमुळे पोलिसांनी तिहार तुरुंगामध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली. या चौकशीमधून महत्वाची बातमी समोर येत आहे. सलमान खान आणि त्याचे वडील यांना मी धमकीचे कोणतेही पत्र पाठवले नाही. अशी माहिती लॉरेन्स बिश्नोईने दिली आहे.  दरम्यान अभिनेत्याच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सलमान खान सध्या हैदराबादमध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’ या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सेटवर देखील कडक सुरक्षा करण्यात आली आहे. प्रत्येक सदस्याची प्रवेश आणि बाहेर पडताना तपासणी केली जात आहे. मग तो कोणीही असो. सलमान खान पुढील २५ दिवस हैदराबादमध्ये चित्रपटाचे शूटिंग करणार आहे, ज्यामध्ये तो अभिनेत्री पूजा हेगडेसोबत दिसणार आहे.

‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट ३० डिसेंबरला रिलीज होणार आहे.  हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट ‘वीरम’चा हिंदी रिमेक आहे. सलमान खानच्या या चित्रपटातून पंजाबची कतरिना कैफ म्हणजेच शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय राघव जुयालही या चित्रपटात दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!