Share

“विरोधकांची तोंड गटार आहेत” ; संजय राऊतांचा घणाघात

Published On: 

मुंबई : मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा 37 वर्षापूर्वी स्थापन झाली. त्या शाखेचा वर्धापनदिन आज आहे. त्यानिमित्त औरंगाबादला शिवसेनेची आज सभा आहे. या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. बऱ्याच काळानंतर राज्याचे मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेर जाऊन सभा घेत आहेत, महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत, त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भाष्य करतली, याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. मात्र विरोधक मुख्यमंत्र्यावर तोंडसुख घेत आहेत. याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “विरोधकांची तोंड हे गटार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावे याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखाविषयी तुमचा व्यक्तिगत आकस असू शकतो, त्यांनी जे काही मोठे काम केले आहे त्याविषयी, पण अशा प्रकारे जर तुमच्या तोंडातून भिजलेले फटाके फुटणार असतील तर त्याची पर्वा आम्ही करत नाही.”

“सरकार स्थापन करताना जे छोटे घटक पक्ष आमच्याबरोबर होते. ते पक्ष आजही आमच्या बरोबर आहेत. कालच शरद पवार आणि मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. एवढ्या मोठ्या सरकारमध्ये काही लहान-सहान गोष्टी असतात. त्या जर राहिल्या असतील तर ताबडतोब करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. प्रत्येक घटक पक्ष हा उद्या च्या निवडणुकीमध्ये महाविकासआघाडी बरोबरच आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!